सुंठवडा पौष्टिकलाडू
साहित्य: १/४ किलो सफेद साखरी खारीक, १/४ किलो गूळ पावडर, १/४ किलो शुद्ध तूप, १/४ किलो किसलेले खोबरे, २५ ग्रॅम खसखस, २५ ग्रॅम भाजलेले मेथीदाणे, २५ ग्रॅम डिंक, १०० ग्रॅम काजू-बदामाचे तुकडे, ५ ग्रॅम सुंठ पावडर.
कृती: खारीक मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. चमचाभर तुपात डिंक तळून घ्या. तळलेला डिंक व मेथीदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. खसखस भाजून घ्या. वाटलेली खारीक, किसलेले खोबरे, सुंठ पावडर, डिंक व मेथीदाणे पूड, भाजलेली खसखस, काजू-बदामाचे तुकडे व आवश्यकतेनुसार तूप घालून मिश्रण चांगले एकजीव करा. चार ते पाच दिवस तयार मिश्रण एका भांड्यात मुरत ठेवा. मिश्रण चांगले मुरल्यानंतर लाडू वळा. सुंठवडा पौष्टिकलाडू तयार.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
सुनंदा प्रधान, नवी मुंबई