शिशिराची थंडी आणि आरोग्याची काळजी

Published by कालनिर्णय आरोग्य डिसेंबर २०१७ on   December 20, 2017 in   2017Health Mantra

शिशिर ऋतू (हिवाळा)

मार्गशीर्ष पौष ( १५ डिसेंबर ते १५ फेबुवारी)

वैशिष्ट्ये


  • गुलाबी व बोचऱ्या थंडीचे रूपांतर कडाक्याच्या थंडीत होते.
  • थंडीमुळे त्वचा कोरडी, खरखरीत पडते.
  • खाजविल्यास त्वचेवर पांढऱ्या रेघोट्या उमटतात.
  • या ऋतूत उद्‌भवणारे आजार
  • सांधेदुखी, संधिवात, आमवात, दमा होतात. अपचनाचे विकार होत नाहीत पण थंडगार वाऱ्यामुळे वातविकार व कफविकार उद्‌भवतात.

काय खावे?


  • या मोसमात उष्ण पदार्थ उपयुक्त ठरतात.
  • तीळगूळ, तिळाची चिक्की, मुगाची मऊसर खिचडी, तूप, गूळपोळी, वांग्याचे भरीत इत्यादी.
  • गहू व तांदळापेक्षा बाजरी वापरावी.
  • बाजरीच्या पिठात थोडे तीळ मिसळावे व त्याची भाकरी करून ती लोण्याबरोवर खावी.
  • मसाल्याच्या पदार्थात मिरे, दालचिनी व ओवा यांचा वापर करावा.
  • गोड पदार्थ खायचे झाल्यास श्रीखंड, खीर, पेढे बर्फी, दुधी हलवा खावा.
  • विविध भाज्यांचे व कडधान्यांचे सूप घेणे चांगले.

काय खाऊ नये?


  • दही खायचे असल्यास गोड व ताजे दही खावे.
  • कफ निर्माण करणारी फळे उदा. पेरू, केळी, सीताफळ खाऊ नयेत.

काय करावे?


  • भरपूर व्यायाम करावा.
  • तेलाने मसाज करून कोमट पाण्याने आंघोळ करावी.
  • त्वचेच्या रक्षणासाठी उबदार कपडे वापरावे.

काय करू नये?


  • कडाक्याची थंडी असल्यास रात्री शक्यतो घराबाहेर पडू नये.
  • दिवसा व रात्री गार जमिनीवर झोपू नये तसेच दिवसभरात सारखे झोपू नये.