मेणबत्ती दिवा

Published by अर्चना जोशी on   October 13, 2017 in   KalaKruti

साहित्य:


  • दोऱ्याचे मोठे प्लॅस्टिकचे रिळ (बंडल)
  • एखादे छोटेसे झाकण
  • लेस
  • बटण
  • अॅक्रिलिक रंग
  • ब्रश
  • टिकल्या
  • कात्री

कृती:


  1. प्लॅस्टिकच्या रिळाला अॅक्रिलिक रंगात रंगवा. (पूर्ण कलर वापरा. जरा चकाकी येईल.)
  2. पूर्णपणे ते वाळू द्या.
  3. वाळलेल्या रिळाच्या निमुळत्या भागावर एखादे छोटे झाकण चिकटवा व सांध्यावर लेस गुंडाळून बो बांधून चिकटवा.
  4. रंगीत बाजूच्या मोठ्या व्यासाच्या खालील बाजूस रंगीत टाकाऊ बटणे एकाआड-एक चिकटवून बॉर्डर तयार करा.
  5. अशीच बॉर्डर झाकणाच्या वरील बाजूससुद्धा बनवा व व्यवस्थित वाळू द्या.
  6. मधल्या मोकळ्या जागेत छोट्या-छोट्या टिकल्या चिकटवून सुशोभित करा.
  7. एका मोठ्या जाड मेणबत्तीचे छोटे-छोटे तुकडे करा व एक तुकडा या मेणबत्ती पात्रात ठेवा. दिवा तयार!

  – अर्चना जोशी | कालनिर्णय नोव्हेंबर २०१३ 

तुम्हीदेखील करता का दिवाळीची हटके सजावट? मग आम्हाला फोटो पाठवायला अजिबात विसरू नका!