झटपट होणारे मेथी चिकन
साहित्य: २ छोटे चमचे तेल, २ लवंगा, २ हिरवी वेलची, ४ काळी मिरी, २-३ लाल मिरच्या, १ मोठा चिरलेला कांदा, १ छोटा चमचा आले-लसूण पेस्ट, ३५० ग्रॅम चिकन ब्रेस्ट तुकडे किंवा ५०० ग्रॅम चिकनचे तुकडे, १ कप दही, १ मोठा चमचा मैदा, १/२ छोटा चमचा धणे पावडर, १/४ चमचा हळद, १ छोटा चमचा जिरेपूड, १ छोटा चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर, १ मोठा चमचा गरम मसाला, २ कप कसूरी मेथी, १ छोटा चमचा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व पाणी.
कृती: सर्वप्रथम कढई तापत ठेवून त्यात तेल, वेलची, काळी मिरी व लवंग घाला. मंदाग्नीवर मसाले भाजून घ्या. त्यानंतर लाल मिरची व चिरलेला कांदा घाला. कांद्याचा रंग लालसर होईस्तोवर परतवून घ्या. त्यात आले-लसूण पेस्ट घालून दोन-तीन मिनिटे परतवून घ्या. चिकन घालून कांदा चांगला शिजवून घ्या. चमच्याने सतत ढवळत राहा. त्यानंतर एका भांड्यात दही, मैदा घालून फेटा. नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, जिरेपूड, धणे पावडर, मीठ, गरम मसाला व दोन मोठे चमचे पाणी घालून मिश्रण चांगले फेटून घ्या. अर्धे कच्चे असलेल्या चिकनमध्ये दह्याचे तयार केलेले मिश्रण घालून मिक्स करा. मंदाग्नीवर चिकन शिजू द्या. चिकन शिजल्यानंतर कसूरी मेथी घाला. गॅस बंद करून लिंबाचा रस घाला व चपातीसोबत सर्व्ह करा.
टीप: बोनलेस चिकन वापरत असाल तर ते अति शिजवू नका, चिवट होईल आणि कोरडे लागेल. शिजले की नाही, हे टूथपिक टोचून तपासत राहा.
अजुन काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गिरीजा नाईक