वयपरत्वे वैद्यकीय तपासण्या वैद्यकीय चाचण्या केवळ वय वाढल्यावरच कराव्या लागतात असे नाही, तर अगदी बाल्यावस्थेपासूनही कराव्या लागतात.शारीरिक, वैद्यकीय समस्या जाणून वेळेत त्यावर उपचार करता यावेत यासाठी या चाचण्या केल्या जातात.अशाच काही चाचण्यांबाबत… १.नवजात बालकांना जन्मजात काही विकार नाहीत ना, हे तपासण्या साठी घोट्यातून रक्त (हील प्रिक) घेऊन चाचणी केली जाते.तसेच श्रवणक्षमतेची चाचणी आणि जन्मजात हृदरोगाची शक्यता