डॉक्टर गुगल पासून सावधान सर्च इंजिन ‘गुगल’ने लोकांचे जीवन सोयीस्कर केले आहे, ह्यात वाद नाही. एका अर्थाने ‘गुगल’ उपयुक्त ठरत असले, तरी आजारांवरील उपचारांसाठी त्याचा वापर होतो, तेव्हा बऱ्याच वेळा ते त्रासदायक ठरू शकते. विविध आजारांची / रोगांची सर्व वैद्यकीय माहिती, लक्षणे, चाचण्या आणि उपयुक्त औषधे आदी सर्व माहिती ‘गुगल’वर उपलब्ध असली, तरी तिथे क्लिनिकल माहिती / मार्गदर्शन नसते, जे केवळ तज्ज्ञ