अद्भुत शेवगा साधारणपणे शेवग्याच्या शेंगा आपल्याकडे आमटीत, सांबारात आणि पिठल्यात घातल्या जातात.दक्षिण भारतात आणि कोकणात शेवग्याच्या पाल्याचाही भाजीसाठी उपयोग केला जातो.शेवग्याच्या झाडाचा प्रत्येक भाग हा पोषणमूल्यांनी परिपूर्ण असतो आणि म्हणूनच या झाडाला अद्भुत गुणांनी युक्त झाड असे म्हटले जाते. शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात ‘अ’, ‘क’, ‘ब १’, ‘ब २’, ‘ब ३’, ‘ब ६’ व फोलेट ही जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम,