स्पर्धेचे नियम आणि अटी :
१. कथा १००/१५० शब्दांचीच असावी. १००/१५० पेक्षा अधिक वर्ण (character)असणाऱ्या कथा बाद ठरवण्यात येतील.
२. आपली कथा आम्हाला kathaspardha@kalnirnay.com या ईमेलद्वारे पाठवता येईल.
३. कथा स्वतःचीच असावी, अनुवादित किंवा इतर लेखकांच्या कल्पनांची ‘कॉपी’ केलेली नसावी. तसे असल्याचे पुढे आढळून आले आणि संबंधित लेखकाने कायदेशीर कारवाई केली तर त्याची जबाबदारी स्पर्धकाकडे असेल. त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, आयोजक जबाबदारी घेणार नाहीत.
५. स्पर्धेसाठी पाठवण्यात येणारी कथा याआधी कुठेही (छापील-दृश्य माध्यमांत अथवा सोशल मीडियावर) प्रकाशित झालेली नसावी.
६. प्रत्येक स्पर्धकाची एकच कथा स्वीकारण्यात येईल.
७. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाची, तसेच विषयाची अट नाही.
८. कथा पाठवण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२० आहे.
९. तुम्ही पाठवलेल्या कथांमधून सर्वोत्कृष्ट कथांची निवड ‘कालनिर्णय’तर्फे करण्यात येईल.
१०. व्यवस्थापनाचा निर्णय अंतिम असून २७ फेब्रुवारी २०२० रोजी निकाल कळवण्यात येईल. स्पर्धेतील विजेत्यांना कालनिर्णयकडून गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल.