नववर्षाभिनंदन ! वर्षाची सुरुवात सुखावह आहे. व्यवसायक्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होतील. महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. काहींना पित्तविकाराचे त्रास संभवतात.
आपल्या प्रामाणिकपणाने केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. परिस्थितीमुळे कधीकधी आपण हतबल ठरतो, याचा अनुभव येईल. गुरुचे पाठबळ तुम्हाला योग्य दिशा दाखवील. व्यवसाय क्षेत्रात आर्थिक व्यवहारात सतर्क राहा.
वर्षाची सुरुवात संमिश्र ग्रहमानात होत आहे. मतभेदास अजिबात थारा देऊ नका. आर्थिक पातळीवरील निर्णय तडकाफडकी घेणे टाळा. विरोधक मुद्दामहून तुमच्या वाटेत येतील, शांत राहा.
वर्षारंभी एखादी शुभवार्ता कानी येईल. नव्या ओळखी लाभदायक ठरतील. महिन्याच्या उत्तरार्धात मात्र थोडे सावधगिरीने वागा. गृहिणींच्या कर्तबगारीला वाव मिळाल्यानेत्यांचा कार्यउत्साह वाढेल.
मित्रपरिवारावर जास्त अवलंबून राहू नका. मनस्ताप टाळण्यासाठी मित्र आणि नातेवाईक यांच्यात योग्य अंतर ठेवा. महिन्याचा उत्तरार्ध सकारात्मक आहे. काही मनाजोगत्या घटना घडतील. समाजात मानमरातब वाढेल.
मित्रपरिवारावर जास्त अवलंबून राहू नका. मनस्ताप टाळण्यासाठी मित्र आणि नातेवाईक यांच्यात योग्य अंतर ठेवा. महिन्याचा उत्तरार्ध सकारात्मक आहे. काही मनाजोगत्या घटना घडतील. समाजात मानमरातब वाढेल.
ग्रहमान म्हणावे तसे अनुकूल नसले तरी तुम्ही आगेकूच करणार आहात. मित्रपरिवार आणि कुटुंबीयांचे अपेक्षेप्रमाणे सहकार्य लाभेल. उत्तरार्धात तुमचा आत्मविश्वास बळावेल. रेंगाळलेली कामे मार्गी लावाल.
संगतीमुळे अधोगती तर होणार नाही ना हे जाणून वागा. आर्थिक व्यवहारात प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. बुधाच्या अनुकूलतेमुळे थोडी प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक पातळीवर समाधानाचे क्षण अनुभवता येतील.
वर्षाच्या सुरुवातीसच प्राकृतिक स्वास्थ्याकडेअधिक लक्ष द्यावे लागणार आहे. दूरच्या प्रवासाचे प्रस्ताव युक्तीने टाळा. कलाकारांना नव्या संधी प्राप्त होतील. विरोधकांवर मात करू शकाल.
कर्तृत्व आणि सचोटी यांचा योग्य समन्वय तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीस साधावा लागणार आहे. कार्यक्षेत्रात सर्वांशी सलोख्याने वागा. आकस्मिक झालेल्या खर्चामुळे आर्थिक गणित बिघडेल. या महिन्यात प्रवासाचे योग येतील.
रखडलेली महत्त्वाची कामे थोरामोठ्यांच्या ओळखीने मार्गी लावता येतील. स्वकीयांबरोबरचे मतभेद वेळीच मिटवा. ज्येष्ठांचे मार्गदर्शन उपकारक ठरेल. आपल्या बोलण्यावर मात्र ताबा ठेवावा लागेल.
ग्रहमानाची चांगली साथ तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीस लाभत आहे. व्यवसाय क्षेत्रात नवे प्रस्ताव समोर येतील,त्यावर विचारपूर्वक निर्णय घ्या. नवीन मोठी खरेदी संभवते. मिळालेल्या यशाने भारावून जाऊ नका.