आत्मविश्वास वाढविणारा हा महिना आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. सरकारी कामांत चौकटीच्या बाहेर जाऊन निर्णय घेऊ नका. प्रेमिकांनी एकमेकांना समजावून घेण्याचा काळ आहे.
ह्या महिन्यात ग्रहमान चांगले असल्याने शत्रूंचा पाडाव करणे सोपे जाईल. जुनी येणी वसूल करताना काही गैरसमज होत नाहीना, ह्याची काळजी घ्या. विवाहेच्छुकांना मनाप्रमाणे जीवनसाथी मिळेल.
ग्रहमान थोडे सावध राहण्याचा इशारा देत आहे. समोरच्या व्यक्तीला न दुखावता कार्यभाग साधावा लागेल. उत्तरार्धात नोकरी-व्यवसाय क्षेत्रात अपेक्षित प्रगतीचा टप्पा गाठता येईल.
ह्या महिन्याचे ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या कर्तृत्वास वाव मिळेल. अपेक्षित यश पदरी पाडू शकाल. आर्थिक प्रगतीकडे वाटचाल होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.
वादविवाद आणि मतभेद बाजूला ठेवून तुम्हाला मार्गक्रमण करावे लागणार आहे. पैसा हे सर्वस्व नसते याचा अनुभव येईल. धंद्याच्या भागीदारीत निवड करताना सतर्क राहा. कौटुंबिक पातळीवर गैरसमजाला वाव देऊ नका.
काहीशा प्रतिकूल ग्रहमानामुळे हाती घेतलेली जबाबदारी पार पाडताना काळजी घ्या. सकारात्मक दृष्टिकोन अवलंबिणे आवश्यक. इतरांवर ठेवलेला विश्वास आपल्याला घातक ठरणार नाही ह्याबाबत जागरूकता बाळगा
‘ दुसऱ्यावर विसंबून राहू नका ‘ असे ह्या महिन्याचे सांगणे आहे. तब्येतीच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष नको. जुन्या दुखण्यांवर वेळीच इलाज योजा. प्रसंगी व्यवसायातील भागीदाराचा सल्लाही विचारात घ्या.
हा महिना अनुकूल आहे. मेहनत, चिकाटी व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर आपले ध्येय पूर्ण करू शकाल. आर्थिक निर्णय ज्येष्ठांशी सल्लामसलत करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा विशेष नावलौकिक होईल.
सध्या अपेक्षापूर्तीचा काळ आहे. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी लाभेल. कुटुंबातील एकोपा टिकविण्यासाठी थोडी तारेवरची कसरत करावी लागेल. लहानांशी वाद टाळा. महिलांनी केलेल्या श्रमांचे चीज होईल.
नोकरी-व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय या महिन्यात घ्यावे लागतील. भावनेच्या आहारी जाऊन कोणालाही शब्द देऊ नका. आर्थिक क्षमता विचारात घेऊनच नव्या योजना कार्यान्वित करा.
ह्या महिन्यात सामाजिक कार्यात अधिक रस घ्याल. नवीन परिचय लाभदायक ठरतील. आर्थिक व्यवहारात मात्र काटेकोर राहा. कुटुंबासाठी अधिक वेळ देणे आवश्यक आहे.
कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरूप बदल करावे लागतील. आपल्या बोलण्यात गोडवा आणलात तर ईस्पित साध्य करणे कठीण जाणार नाही. कलाकारांचा नावलौकिक वाढेल. शासकीय कामात यश लाभेल.