‘ कुणावर विसंबून राहू नका ‘ असे ह्या महिन्याचे सांगणे आहे. आर्थिक बाबतीत तर अजिबात नको. सुसंवादातून प्रगती साधता येईल. प्रेमात थोडे
ह्या महिन्याचे ग्रहमान मिश्र स्वरूपाचे आहे. समाजात प्रतिमा उंचावेल. तुमच्या स्वभावामुळे काही मने जिंकली जातील. आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी मात्र अधिक श्रम करावे लागतील. चैनीच्या खर्चाला मात्र कात्री लावावी लागेल.
कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. कार्यक्षेत्रातील कामाच्या योग्य नियोजनाने यशाचा आनंद अनुभवाल. भागीदारीतील मतभेद वाढू देऊ नका. महिलांना वाढता कौटुंबिक खर्च सांभाळणे थोडे अवघड जाईल.
सरकार दरबारची कामे ह्या महिन्यात मार्गी लागतील. कर्तव्यपूर्तीसाठी कौटुंबिक पातळीवर मनाविरुद्ध काही तडजोडी कराव्या लागणार आहेत. आपल्या प्रतिष्ठेचा अधिक बाऊ न करता थोडे सबुरीने घ्या. उत्तरार्धात प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी संभवतात.
‘अतिरेक टाळा’ असे ह्या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे. नोकरी-व्यवसायात ‘आपण बरे का आपले काम बरे’ हे योग्य. मोठ्या व्यक्तींच्या ओळखी लाभदायक ठरतील. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम संधी मिळेल.
काहीशा प्रतिकूल ग्रहमानामुळे हाती घेतलेली जबाबदारी पार पाडताना काळजी घ्या. सकारात्मक दृष्टिकोन अवलंबिणे आवश्यक. इतरांवर ठेवलेला विश्वास आपल्याला घातक ठरणार नाही ह्याबाबत जागरूकता बाळगा.
‘दुसऱ्यांवर विसंबून राहू नका’ असे ह्या महिन्याचे सांगणे आहे. तब्येतीच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष नको. जुन्या दुखण्यांवर वेळीच इलाज योजा. प्रसंगी व्यवसायातील भागीदाराचा सल्लाही विचारात घ्या.
हा महिना अनुकूल आहे. मेहनत, चिकाटी व प्रामाणीकपणा यांच्या जोरावर आपले ध्येय पूर्ण करू शकाल. आर्थिक निर्णय ज्येष्ठांशी सल्लामसलत करून घ्या. कला-क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचा विशेष नावलौकिक होईल.
सध्या अपेक्षापूर्तीचा काळ आहे. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील एकोपा टिकविण्यासाठी थोडी तारेवरची कसरत करावी लागेल. लहानांशी वाद टाळा. महिलांनी केलेल्या श्रमाचे चीज होईल.
नोकरी-व्यवसायात काही महत्त्वाचे निर्णय या महिन्यात तुम्हाला घ्यावे लागतील. भावनेच्या आहारी जाऊन कोणालाही शब्द देऊ नका. आर्थिक क्षमता विचारात घेऊनच नव्या योजना कार्यान्वित करा.
ह्या महिन्यात सामाजिक कार्यात अधिक रस घ्याल. नवीन परिचय लाभदायक ठरतील. आर्थिक व्यवहारात मात्र काटेकोर राहा. कुटुंबासाठी अधिक वेळ देणे आवश्यक आहे.
कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरूप बदल करावे लागतील. आपल्या बोलण्यात थोडा गोडवा आणलात तर ईस्पित साध्या करणे कठीण जाणार नाही. कलाकारांचा नावलौकिक वाढेल. शासकीय कामात यश लाभेल.