हर्षल प्रथम, शुक्र चतुर्थ, रवि-मंगळ-बुध-राहु पंचम, गुरु षष्ठ, शनि अष्टम, प्लुटो नवम, चंद्र दशम, चंद्र-नेपच्युन-केतु लाभ, चंद्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आपल्या आवडत्या विषयांत तसेच छंदासाठी वेळ देण्याचा मनोदय पुर्णत्वास जाईल. विविध प्रकारच्या स्वादिष्ठ भोजनावर मर्यादा घाला. घरगुती वातावरण चांगले राहील. शुभ कार्य पार पडतील. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढावा लागेल. प्रेमिकात गैरसमज होण्याची शक्यता आहे. जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करु नका ़वैवाहिक जीवनात वादविवाद टाळा. नोकरीतील धरसोड वृत्ती सोडून द्या. वरिष्ठांना विश्र्वासात घेऊन आपली अडचण सांगा. त्यांच्या मधील गैरसमज दूर करा.
शुक्र पराक्रम, रवि-मंगळ-बुध-राहु चतुर्थ, गुरु पंचम, शनि सप्तम, प्लुटो अष्टम, चंद्र नवम, चंद्र-नेपच्युन-केतु दशम, चंद्र लाभ, हर्षल व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. काही कामानिमित्त जवळपासचे प्रवासाचे बेत आखावे लागतील. कौटुंबिक अडचणींचा सामना करावा लागेल. घर सांभाळण्यासाठी बरीच कसरत करावी लागेल. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. विद्यार्थ्याची अभ्यासात उत्तम प्रगती होईल. शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. एकमेकांच्या विचारांना योग्य संधी द्या. समोरील व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा विचार करा. जोडीदाराशी कुठल्याही खाजगी गोष्टी लपवू नका. काही प्रश्नांची सोडवणूक सर्वाना एकत्र आणून करावी लागेल.
शुक्र द्वितीय, रवि-मंगळ-बुध-राहु पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि षष्ठ, प्लुटो सप्तम, चंद्र अष्टम, चंद्र-नेपच्युन-केतु नवम, चंद्र दशम, हर्षल लाभस्थानातुन भ्रमण करणार आहेत. आपल्या जबाबदारीत वाढ संभवते. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. अचानकपणे येणाऱ्या विचारांनी अभ्यासात व्यत्यय येऊ शकेल. विद्याथ्र्यानी कसून अभ्यास करावा. आपल्या योजनांचा योग्य पाठपुरवठा करा. रेंगाळलेल्या गोष्टीकडे लक्ष घातल्यास त्याचा फायदा भविष्यात जरुर मिळेल. आपल्या वरिष्ठांना गृहित धरु नका. व्यवसायक्षेत्राकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे आहे. नवे व्यवहार चातुर्याने करा. डोके शांत ठेवून वागणे श्रेयस्कर राहील.
शुक्र प्रथम, रवि-मंगळ-बुध-राहु द्वितीय, गुरु पराक्रम, शनि पंचम, प्लुटो षष्ठ, चंद्र सप्तम, चंद्र-नेपच्युन-केतु अष्टम, चंद्र नवम, हर्षल दशमस्थानातुन भ्रमण करणार आहेत. कौटुंबिक कर्तव्यास प्राधान्य देताना आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करु नका ़ मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा ़ लोभामुळे आर्थिक संकट ओढवून घेऊ नका. सतत वाढत राहणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्याना मेहनत करावी लागेल. अति आत्मविश्वास व अहंभाव सोडावयास हवा अशा वृत्तीने अभ्यासात खंड पडू शकेल. तरुण-तरुणींनी आपले प्रेम वृध्दींगत करावयास हवे. जीवनात सुखद अनुभव घेण्यासाठी सामंजस्य ठेवा. जोखमीची देवाण-घेवाण काळजी पूर्वक करा.
राशीस्थानी रवि-मंगळ-बुध-राहु, गुरु द्वितीय, शनि चतुर्थ, प्लुटो पंचम, चंद्र षष्ठ, चंद्र-नेपच्युन-केतु सप्तम, चंद्र अष्टम, हर्षल नवम, शुक्र व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करुन आपली खाण्याची पध्दती बदलू नका. अपचनाचा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी लागेल. बँकेकडून किंवा इतर कोणाकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा असल्यास तसा प्रयत्न करायला हरकत नाही. आर्थिक लाभ व्यवस्थित होत रहातील ़ कौटुंबिक कर्तव्य पुर्ण करा. आव्हानांचा सामना करताना आत्मविश्वास वाढेल. नकारात्मक लोकांपासून दूर रहा. प्रेमातील जोडिदाराला दिलेला शब्द पाळण्यास विसरु नका. वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. कुटुंबातील त्यांच्या स्थानाची जाण करुन द्या.
आपल्या राशीत गुरु, शनि पराक्रम, प्लुटो चतुर्थ, चंद्र पंचम, चंद्र-नेपच्युन-केतु षष्ठ, चंद्र सप्तम, हर्षल अष्टम, शुक्र एकादश, रवि-मंगळ-बुध-राहु व्ययस्थानातुन भ्रमण करणार आहेत. बाहेरील खाण्यापेक्षा घरगुती जेवण व फलाहारावर भर द्या. खाण्यापिण्यात निष्काळजीपणा करु नका. परदेशाला जाण्याचे आपले स्वप्न या आठवडयात पुर्ण होण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक सौख्य बिघडविणाऱ्या बाबी टाळण्याचा प्रयत्न करा. कुटुंबियांना आपलेसे करुन पुढे वाटचाल करा ़ प्रेमात भावनांचा अतिरेक होता कामा नये. जोडिदाराच्या प्रेमाची परिक्षा पाहु नका. जीवनसाथीबरोबर वैचारिक साम्यता ठेवा. निर्णय घेताना संयम बाळगा. तुमची संवाद कौशल्ये प्रभावी ठरु शकतील.
शनि द्वितीय, प्लुटो पराक्रम, चंद्र चतुर्थ, पंचमात चंद्र-नेपच्युन-केतु, चंद्र षष्ठ, सप्तमात हर्षल, शुक्र दशमात, लाभात रवि-मंगळ-बुध-राहु, गुरु व्ययस्थानात असे ग्रहमान असतील. नोकरीमध्ये अग्रेसर राहाता येईल. जबाबदारीची कामे करताना संबधीत व्यक्तींना विश्वासात घेणे गरजेचे आहे. कार्यसाफल्याचा आनंद मिळेल. व्यवसायातील भागीदारीच्या व्यवहारात अतिशय सावधपणे निर्णय घ्यावे लागतील. कोणाच्याही दबावाखाली आर्थिक व्यवहार करणे धोक्याचे ठरेल. पैशांचा व्यवहार करताना नीट काळजी घ्यावी. प्रेम बंधनात असल्यास एकमेकांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. विवाहाची बोलणी करण्यापूर्वी आलेल्या स्थळाची नीट माहिती घेऊनच मग योग्य तो निर्णय घ्या. बोलण्यावर नियंत्रण राखा.
शनि प्रथम, प्लुटो द्वितीय, चंद्र पराक्रम, चतुर्थात चंद्र-नेपच्युन-केतु, चंद्र पंचम, षष्ठात हर्षल, नवमात शुक्र, रवि-मंगळ-बुध-राहु दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. नोकरीत स्थिरता व समाधान प्राप्त होईल. सहकाऱ्यांशी सलोख्याने वागा ़ व्यावसायिकांनी आवाक्याबाहेरचे धाडस करु नये. कोणाच्या प्रभावाखाली जाऊन निर्णय घेऊ नये. परिस्थितीनुसार आपल्या आर्थिक धोरणात बदल करणे योग्य ठरेल अशा वृत्तीमुळे धनसंचय उत्तम प्रकारे करता येऊ शकतो. प्रिय व्यक्तींच्या मनाचा वेध घ्या. आपल्या प्रेमातील जोडीदाराचा अहंकार जपणे गरजेचे आहे ़ जोडीदाराविषयीची गुढ भावना मनातून काढून टाका. त्यांच्याशी खाजगी गोष्टी लपवू नका. प्रत्येक गोष्टीत सतर्कता ठेवणे हितकारक ठरणार आहे.
आपल्या राशीत प्लुटो, पराक्रमात चंद्र-नेपच्युन-केतु, चंद्र चतुर्थ, पंचमात हर्षल, अष्टमात शुक्र, नवमात रवि-मंगळ-बुध-राहु, गुरु दशम, शनि व्ययात अशी ग्रहांची रचना असेल. पात्रतेप्रमाणे रोजगाराची संधी लाभेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या चांगल्या कामाची दखल घेतील. व्यवसायाची घडी मजबूत झाल्याचे समाधान होईल. व्यवसाय धंद्यात व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. जमा व खर्च यांचा तालमेळ ठेवल्यास बऱ्याच चिंता कमी होतील. उसने पैसे देताना खोल विचार करावा. घरातील माणसांची मने सांभाळावी लागतील. संततीच्या समस्याकडे लक्ष द्या. कर्तव्यपालनासाठी कौटुंबिक पातळीवर तडजोडी कराव्या लागतील. अभ्यासात खंड पडणे प्रगतीला घातक असते. अभ्यासांत स्व:तचे मन रमविण्याचा प्रयत्न करा.
चंद्र प्रथम, द्वितीयात चंद्र-नेपच्युन-केतु, पराक्रमात चंद्र, चतुर्थात हर्षल, सप्तमात शुक्र, अष्टमात रवि-मंगळ-बुध-राहु, नवमात गुरु, लाभात शनि, व्ययस्थानात प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. घरातील माणसांची मने सांभाळा. घरातील वाद घरातच सोडवा. तुम्हास गोड आश्वासन देणाऱ्या नातेवाईकांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे. अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभेल. विद्याभ्यासात मनाप्रमाणे यश मिळविता येईल. वाहन चालविताना वाहनाच्या गतिवर नियंत्रण ठेवावे लागेल. कायद्याचे उल्लंघन करु नयेत. मित्रमंडळी, आप्तइष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. येणाऱ्या पैशासाठी पाठपुरावा करा. मरगळ झटकून अर्थाजन कसे होईल याचा विचार करा. स्वतःच्या अपेक्षांवर संयम ठेवणे गरजचे भासेल.
राशीस्थानी चंद्र-नेपच्युन-केतु, द्वितीयात चंद्र, पराक्रमात हर्षल, षष्ठात शुक्र, सप्तमात रवि-मंगळ-बुध-राहु, अष्टमात गुरु, दशमात शनि, लाभस्थानी प्लुटो, व्ययात चंद्र असे ग्रहमान असतील. नोकरीतील प्रगती समाधानकारक राहील. नोकरीच्या शोधार्थीना यश मिळेल. व्यवसायात भागीदारी उपयुक्त नाही. कामाचा व्याप कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणतेही लेखी व्यवहार करताना विचारपुर्वक करावेत. अर्थप्राप्तीसाठी सुयोग्य नियोजन करा. कोणताही आर्थिक व्यवहार अनोळखी व्यक्तीशी करु नका. प्रकृती स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगसाधना करणे हितावह ठरेल. निर्णय घेताना योग्य-अयोग्यतेचा नीट विचार करावा. कायदे विषयक प्रश्न सोडविताना मध्यस्थावर अवलंबून राहू नये. पत्रव्यवहार काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे.
चंद्र प्रथम, द्वितीयात हर्षल, पंचमात शुक्र, षष्ठात रवि-मंगळ-बुध-राहु, सप्तमात गुरु, नवमात शनि, दशमात प्लुटो, चंद्र लाभात, व्ययात चंद्र-केतु-नेपच्युन असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. आपल्या खाण्याच्या वेळा निश्चित ठेवा. आपले जेवण खान व्यवस्थित ठेवा. कौटुंबिक जबाबदारीचे काटेकोर पालन करा. घरातील मंडळींची मने जिंकण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधातील येणाऱ्या अडचणींना सामना करण्याचे धाडस दाखवा. प्रेमसंबंधात वाढ करण्याचा प्रयत्न करा. तरुण-तरुणींनी आपल्या प्रेमावर ठाम विश्वास ठेवावा. गैरसमज टाळा. घरातील पाळीव प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातुल घराण्यामध्ये होणाऱ्या वादविवादाला सहकार्य करु नयेत. जिद्द हवी पण हट्टीपणा नको.