चंद्र- रवि-बुध- हर्षल प्रथम, चंद्र-मंगळ द्वितीय, राहू पंचम, गुरु षष्ठ, शनि- प्लुटो नवम, चंद्र-नेपच्युन- केतु लाभ, चंद्र-शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. प्रेमात विरहाचे प्रसंग येतील. नीती-अनीतीच्या कल्पना झुगारून दिल्या जातील. आपल्या विवेकबुद्धीने त्यांना हाताळा. वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. कुटुंबातील त्यांच्या स्थानाची जाण करून दया. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाका. मोठेपणाच्या खोटया कल्पनेपायी खर्च वाढवत बसू नका. दुसऱ्यांच्या चुका दाखवताना सौम्य शब्दात सांगा. वडिलधाऱ्यांशी वाद नकोत. शांत राहून परिस्थिती काबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. राग आला तरी पटकन रागावून नातेसंबंध तोडू नये. असुरक्षिततेची भावना व शत्रूंचा त्रास वाचवण्यासाठी प्रयत्नशील राहा.
चंद्र-मंगळ प्रथम, राहू चतुर्थ, गुरु पंचम, शनि- प्लुटो अष्टम, चंद्र-नेपच्युन- केतु दशम, चंद्र-शुक्र लाभ, चंद्र-रवि-बुध-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. सकारात्मक विचारांना प्राधान्य दिल्यास उत्तम आरोग्य लाभेल. सकस व सात्विक शुद्ध आहार व आराम चांगले आरोग्य प्रधान करेल. पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाल्याने समाधान लाभेल. मोठी गुंतवणूक टाळावी. खर्च वाढला तरी काही चांगल्या घटना घडतील. घरातील माणसांकडून जास्त अपेक्षा बाळगू नका. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. बुद्धीचा वापर करून घरात एकोपा नांदवणे जरूरीचे आहे. एक गोष्ट मिळवण्यासाठी अन्यत्र तडजोड करावी लागेल. स्वत:ची आत्मप्रौढी मिरवणे टाळावे.
राहू पराक्रम, गुरु चतुर्थ, शनि- प्लुटो सप्तम, चंद्र-नेपच्युन-केतु नवम, चंद्र-शुक्र दशम, चंद्र- रवि- बुध-हर्षल लाभ, चंद्र-मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. प्रेम संबंधात सावधानतापूर्वक विचार करावयास हवा. साथीदार सुशिक्षित व स्थिर वृतीचा असेल. एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. पती- पत्नीत सामंजस्यांचा अभाव राहील. शक्यतो जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष न देणे उचित होईल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यास लाभाचे प्रमाण वाढेल. नोकरीत स्थिरता असेल. आपल्या बुद्धीचातुर्याने नोकरीत मानाचे स्थान प्राप्त होईल. व्यवसायात नावलौकिक होईल. व्यवसायातील प्रगतीचा आलेख गतीमान राहील. महत्वाच्या कागदपत्रांवर सहया करण्यापूर्वी पुरेशी काळजी घेणे आवश्यक ठरेल.
राहू द्वितीय, गुरु पराक्रम, शनि-प्लुटो षष्ठ, चंद्र-नेपच्युन-केतु अष्टम, चंद्र-शुक्र नवम, चंद्र- रवि- बुध-हर्षल दशम, चंद्र-मंगळ लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्याच्या जुन्या तक्रारीकडे दुर्लक्ष करु नका. मनाचे संतुलन बिघडू देऊ नका. आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी सकाळी फिरायला जा. योगासनावर भर द्या. खरेदी-विक्रीच्या मोहात पडू नका. जुनी वसुली करताना हितसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. आपल्या विरोधकांना जागीच खिळवून ठेवाल. सरकारी तसेच प्रशासकीय कामे उत्तमरित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. एकदा ठरवलं की त्या दिशेने कामाला लागा, तरच यश मिळेल.
राशीस्थानी राहू, गुरु द्वितीय, शनि-प्लुटो पंचम, चंद्र-नेपच्युन-केतु सप्तम, चंद्र- शुक्र अष्टम, चंद्र- रवि-बुध-हर्षल नवम, चंद्र-मंगळ दशमस्थानातून भ्रमण करणार आहेत. आपल्याला आपल्या गुरुजनांची तसेच वृद्धांची सेवा करण्याची संधी मिळेल. कोर्ट कचेरीच्या कामातील बदल सकारात्मकता दाखवेल. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आहारविहाराची बंधने पाळणे अत्यावश्यक तरेल. आर्थिकमान चांगले असल्याने वातावरण आनंदी राहील. हाती मोठया प्रमाणात पैसे येतील. प्रेमसंबंधात तणाव आणू नका. जोडीदाराशी मतभेदास कारणीभूत ठरणारे मुद्दे टाळा. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. पती- पत्नीनी प्रयत्नपूर्वक एकमेकांच्या आवडीनिवडी जपाव्यात व एकमेकांना सहकार्य करावे. आपल्या लहरी आणि हट्टी स्वभावाला थोडी मुरड घातल्यास वातावरण सलोख्याचे राहील.
आपल्या राशीत गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, चंद्र- नेपच्युन-केतु षष्ठ, चंद्र- शुक्र सप्तम, चंद्र-रवि- बुध- हर्षल अष्टम, चंद्र-मंगळ नवम, राहू व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्यसंपत्तीचे संवर्धन करण्यात दक्ष राहा. अधूनमधून प्रकृतीच्या आवश्यक त्या तपासण्या करून घेणे हितावह आहे. अती विचार टाळावेत. नातेवाईकांच्याकडून अपेक्षा ठेवू नका. नातेवाईकांच्या मध्यस्थीने कोणतेही व्यवहार करु नका. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. आपल्या जीवलग व्यक्तीवर जास्त अपेक्षांचे ओझे ठेवू नका. जोडीदाराच्या मतांचा विचार करा आणि आदर ठेवा. वैवाहिक जोडिदाराच्या मनाचा वेध घेण्यास तत्पर राहा. वैवाहिक सौख्य वृद्धिंगत करण्यासाठी घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या.
पराक्रमात शनि-प्लुटो, पंचमात चंद्र- नेपच्युन-केतु, चंद्र-शुक्र षष्ठ, चंद्र-रवि-बुध-हर्षल सप्तमात, चंद्र-मंगळ अष्टमात, राहू लाभात, व्ययात गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. स्वत चे आरोग्य सांभाळणे आपल्या हाती आहे. नियमित साधा सात्विक आहार घ्या. रोजचे चालणे, व्यायाम, योगसाधना करावयास हवी. बऱ्याच दिवसापासून मातुल्य घराण्याकडे जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत आहेत. आपल्या बोलण्यामध्ये माधुर्य आणण्याचा प्रयत्न करा. खर्चापेक्षा पैशाच्या संचयनाचा विचार करणे आवश्यक आहे. प्रॉपर्टीत पैसा गुंतवून फसू नका. गोड बोलणाऱ्या मित्रांपासून सावध राहा. पत्रव्यवहार जपून करावा. वाहन चालविताना वाहनाच्या गतिवर योग्य ते नियंत्रण ठेवावे लागेल.
द्वितीयात शनि-प्लुटो, चतुर्थात चंद्र-नेपच्युन- केतु, पंचमात चंद्र-शुक्र, षष्ठात चंद्र-रवि-बुध- हर्षल, सप्तमात चंद्र-मंगळ, राहू दशमात, लाभात गुरु असे ग्रहमान असतील. सकस व सात्विक शुद्ध आहार व योग्य विश्रांती चांगले आरोग्य प्रदान करेल. स्वत:च्या तब्येतीची जोपासना करा. सकाळी लवकर उठून जलद चालण्याचा व्यायाम केल्यास लाभ होईल. बँकेकडून किंवा इतर कोणाकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा असल्यास प्रयत्न करायला हरकत नाही. खरेदी करताना किंमत कमी करण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील धरसोड वृत्ती सोडून द्या. नोकरीत अशामुळे स्थिरता मिळत नाही. व्यापाऱ्यांनी करार करताना आपला धंदा कसा वाढेल याचा विचार करून तसे करावेत. काळानुसार बदलायला हवंच.
आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात चंद्र-नेपच्युन- केतु, चतुर्थात चंद्र- शुक्र, पंचमात चंद्र-रवि- बुध-हर्षल, षष्ठात चंद्र-मंगळ, नवमात राहू, गुरु दशमात अशी ग्रहांची रचना असेल. आपल्या ठामाचा योग्य मोबदला प्राप्त होईल. नोकरीतील प्रगती लाभदायक आहे. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्विकारण्याची तयारी ठेवा. व्यावसायिकांनी आवाक्याबाहेरचे धाडस करु नये. कोणाच्या प्रभावाखाली जाऊन निर्णय घेऊ नये. कामगारांशी व्यवहार करतांना जपून करावे. स्वत:ची कामे शक्यतो स्वत वेळेवर करा. तुम्ही कुटुंबियांना आपलेसे करून पुढे वाटचाल करा. घरगुती वातावरण चांगले ठेवा. संततीच्या चुकाबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. स्वत:च्या कामाबद्दल व कर्तव्याबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल.
द्वितीयात चंद्र-नेपच्युन- केतु, पराक्रमात चंद्र-शुक्र, चतुर्थात चंद्र-रवि- बुध-हर्षल, पंचमात चंद्र- मंगळ, अष्टमात राहू, नवमात गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. क्षमतेपेक्षा अधिक परिश्रम करणे आरोग्यास हानीकारक तरेल. स्वभावात चिडचिडेपणा वाढण्याची शक्यता आहे. तब्येत बिघडेपर्यंत जागरण करु नका. आर्थिक धोरणात परिस्थितीनुरूप बदल करा. पैशांचे व्यवहार करताना माणसांची योग्य पारख करा. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. घरात ज्येष्ठांना चार सबुरीच्या गोष्टी सांगणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट फार न ताणता त्यातून सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल हयाचा विचार करा. विद्यार्थ्यांनी कसून कष्ट करावेत तरच यश मिळेल. गोड बोलून कार्य साध्य करा.
राशीस्थानी चंद्र- नेपच्युन-केतु, द्वितीयात चंद्र- शुक्र, पराक्रमात चंद्र-रवि- बुध-हर्षल, चतुर्थात चंद्र- मंगळ, सप्तमात राहू, अष्टमात गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. या आठवडयात शक्यतो कोणाला जामिन न राहणे उचित होईल. लेखी व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची खात्री करून घेण्यासाठी जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करून घ्यावे. घरगुती गोष्टींचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नये. कौटुंबिक जीवनात मतभेद जरी तीव्र झाले तरी टोकाची भूमिका न घेता विसरा व क्षमा करा. घरगुती वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्या. आपल्या कामातून ओळख निर्माण करा.
आपल्या राशीत चंद्र- शुक्र, द्वितीयात चंद्र- रवि- बुध- हर्षल, पराक्रमात चंद्र-मंगळ, षष्ठात राहू, सप्तमात गुरु, दशमात शनि- प्लुटो, व्ययात चंद्र- नेपच्युन- केतु असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. प्रिय व्यक्तीच्या कामात हातभार लावा. परस्परांमधील लहानसहान मतभेद दूर करा. एकमेकांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील काही सदस्य दुराग्रही असू शकतात. घरातील वाद एकमेकांच्या सामोपचाराने घरातच सोडवा. ज्येष्ठ व्यक्तीचा मान राखा. नोकरदार लोकांनी आपल्या वरिष्ठांशी अतिशय जपून राहावे. ऑफिसमध्ये फालतू राजकारणात भाग घेऊ नये. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. आपण कामातून स्वत : च्या कुवतीनुसारच व्यापार करावा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा झगडून मिळवावी लागेल.
मासिक राशीभविष्य जाणून घ्या आपली कुंडली