बुध-शुक्र-हर्षल प्रथम, रवि द्वितीय, चंद्र-मंगळ पराक्रम, चंद्र चतुर्थ, चंद्र-राहु पंचम, चंद्र-गुरु षष्ठ, शनि-प्लुटो नवम, नेपच्यून-केतू लाभ, शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होता कामा नये. शिक्षणाच्या निमित्ताने प्रवास होतील. अर्थाजनांतील गोंधळाची स्थिती विचारपूर्वक हाताळा. मरगळ झटकून अर्थाजन कसे होईल याचा विचार करा. पैशासाठी तगादा लावा. प्रेमात विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. वैवाहिक जीवन सुखावह असेल. पतीपत्नीनी किरकोळ गोष्टीवरुन वाद घालणे टाळावे. व्यवहाराच्या कायदेशीर बाबीकडे लक्ष द्या. कामात निर्माण होणारे अडथळे सहकाऱ्यांच्या मदतीने दूर करु शकाल.
रवि प्रथम, चंद्र-मंगळ द्वितीय, चंद्र पराक्रम, चंद्र-राहु चतुर्थ, चंद्र-गुरु पंचम, शनि-प्लुटो अष्टम, नेपच्यून-केतू दशम, शुक्र लाभ, बुध-शुक्र-हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्याच्या तक्रारींचा घाबरुन न जाता मुकाबला करा. आरोग्यविषयक तपासण्या करण्यात टाळाटाळ करु नये. झोपेचे तंत्र सांभाळा. कुटुंबातील आपली एकरुपता काहीशी कमी जाणवत आहे. गोंधळलेल्या स्थितीचा त्याग करा. एक दुसऱ्यांचे स्वभाव जुळत नसतानासुध्दा प्रत्येकाशी जुळवून घ्यावे लागेल. विद्यार्थ्यांना अध्ययनात योग्य यश प्राप्त करता येईल. प्रयत्न चिकाटी व सातत्य हवे. काम योग्य वेळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कोणाला ही आश्र्वासन देऊ नका. आपल्या कार्याची योजनांची गुप्तता पाळा.
चंद्र-मंगळ प्रथम, चंद्र द्वितीय, चंद्र-राहु पराक्रम, चंद्र-गुरु चतुर्थ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्यून-केतू नवम, शुक्र दशम, बुध-हर्षल-शुक्र लाभ, रवि व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. डोके शांत ठेवून वागणे श्रेयस्कर राहील. उष्णतेच्या त्रासापासून जपावे. प्रकृतीची काळजी अवश्य घ्यावी. वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या. तुमच्यात असलेली विवेकबुध्दी वापरुन तुम्ही अशक्य कठीण परिस्थितीवर मात करु शकाल. सबुरीचे धोरण स्विकारा ज्येष्ठांचा सल्ला घ्या. सलोखा व न्यायबुध्दीचा वापर करा. जुन्या घरासंबंधीचे सर्व प्रश्न मनासारखे सुटतील. घरातील वातावरण सौम्य ठेवण्याचा प्रयत्न करा. बुध्दीचातुर्याने पैलूंचा विकास करा. अभ्यासात घाई गर्दी करणे योग्य नाही.
चंद्र प्रथम, चंद्र-राहु द्वितीय, चंद्र-गुरु पराक्रम, शनि-प्लुटो षष्ठ, नेपच्यून-केतू अष्टम, शुक्र नवम, बुध-शुक्र-हर्षल दशम, रवि लाभ, चंद्र-मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. स्वभावात काहीसा तापटपणा येईल. एकटयाने राहून अस्वस्थता वाढवून घेऊ नका. रागावर आणि चिडचिडीवर नियंत्रण ठेवा. स्वत:च्या बोलण्याने शत्रुता वा कटूता वाढवू नका. कौटुंबिक प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. वादविवादाचे प्रसंग टाळा. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नये. लेखी व्यवहारात चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. कामाचा उरक जास्त राहिल. वरिष्ठांना विश्वासात घेऊन आपली अडचण सांगा. त्यांच्या मधील गैरसमज दूर करा. थोडे नमते घ्या.
राशीस्थानी चंद्र-राहु, चंद्र-गुरु द्वितीय, शनि-प्लुटो पंचम, नेपच्यून-केतू सप्तम, शुक्र अष्टम, बुध-शुक्र-हर्षल नवम, रवि दशम, चंद्र-मंगळ लाभ, चंद्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. पैशाचा सततचा ओघ लक्षात घेता भविष्यकालीन योग्य गुंतवणूक हितकारक आहे. नातेवाईकांपासून आर्थिक व्यवहारात सावध रहावे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आपली हुकूमशाही आवरा. सहजीवन म्हणजे तडजोड हे लक्षात ठेवा. कामावर असलेली जबाबदारी स्विकारा. जबाबदारी निभावण्याची क्षमता आपल्यात पूरेपूर आहे. प्रेम करताना योग्य व्यक्तिची निवड करा. एक दुसऱ्याचा विश्वास संपन्न करा. व्यवसायातील प्रगतीचा आलेख गतीमान राहील. सहकाऱ्यांबरोबर वादविवाद करु नका . नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.
आपल्या राशीत चंद्र-गुरु, शनि-प्लुटो चतुर्थ, नेपच्यून-केतू षष्ठ, शुक्र सप्तम, बुध-शुक्र-हर्षल अष्टम, रवि नवम, चंद्र-मंगळ दशम, चंद्र लाभ, चंद्र-राहु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. व्यायामाची आवड निर्माण करा. नेहमी सकस व ताजे अन्न खाल्ले पाहिजे. आपले वजन नियंत्रणात ठेवा. घरात लवचिक धोरण ठेवा. भावाबहिणीशी काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणासाठी नवे वेळापत्रक तयार करावे. विद्यार्थ्यांनी काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करावा. साथीदाराच्या कामाचे कौतुक करा. आपल्या वागण्यात बदल आणा. जीवनसाथीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. सामाजिक कार्यातून लाभ होईल.
पराक्रमात शनि-प्लुटो, पंचमात नेपच्यून-केतू, शुक्र षष्ठ, बुध-शुक्र-हर्षल सप्तमात, रवि अष्टमात, चंद्र-मंगळ नवमात, चंद्र दशमात, चंद्र-राहु लाभात, व्ययात चंद्र-गुरु अशी ग्रहांची ठेवण असेल. अध्यात्मिक क्षेत्रात करत असलेल्या प्रयत्नाना उत्तम यश लाभतील. विद्यार्थ्यांनी बाहेरील मोहजालापासून स्व:ला अलिप्त ठेवून आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता ठेवावी. प्रेम संबंधात सावधानतापूर्वक विचार करावयास हवा. दिलेला शब्द पाळण्याचे कसोशीने प्रयत्न करा. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. पती-पत्नीनी प्रयत्नपूर्वक एकमेकांच्या आवडीनिवडी जपाव्यात व एकमेकांना सहकार्य करावे. महत्वाची मंजूरी अपेक्षित असेल तर ती मिळेल. मान सन्मान प्राप्त होईल. स्वत:जवळील कौशल्य वापरा.
शनि-प्लुटो द्वितीय, चतुर्थात नेपच्यून-केतू, पंचमात शुक्र, षष्ठात बुध-शुक्र-हर्षल, सप्तमात रवि, अष्टमात चंद्र-मंगळ, नवमात चंद्र, चंद्र-राहु दशमात, लाभात चंद्र-गुरु असे ग्रहमान असतील. तुम्ही शारीरिक अडचण असल्यास ताबडतोब डॉक्टरी इलाज जरुर करावेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल घडविण्याची गरज आहे. योगासनावर भर द्या. वाहन चालविताना काळजी घ्यावी. अधिक पैशाचा हव्यास टाळणे उचित होईल. आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण विचारंती करणे जरुरी आहे. कोणताही आर्थिक निर्णय ठामपणे घ्यावा. नोकरीतील घरसोड वृत्ती सोडून द्या. नोकरीत अशामुळे स्थिरता मिळत नाही. व्यापाऱ्यांनी करार करताना आपला धंदा कसा वाढेल याचा विचार करुन तसे करावेत.
आपल्या राशीत शनि-प्लुटो, पराक्रमात नेपच्यून-केतू, चतुर्थात शुक्र, पंचमात बुध-शुक्र-हर्षल, षष्ठात रवि, सप्तमात चंद्र-मंगळ, अष्टमात चंद्र, नवमात चंद्र-राहु, चंद्र-गुरु दशम अशी ग्रहांची रचना असेल. रेंगाळलेले काम पूर्ण करण्यांची संधी मिळेल. इतरांसाठी कठीण असणारे विषय तुम्ही सहजरित्या सोडवाल. नोकरीसाठीचा प्रयत्न यशस्वी होईल. व्यावसायिकांनी बाजारांतील अफवांवर विश्वास ठेवू नये म्हणजे आपल्यास कोणताही तोटा होणार नाही. काळानुसार बदलायला हवंच. घरगुती कामासाठी वेळ काढा. घरासंबंधीच्या गोष्टी हातावेगळ्या करु शकाल. प्रेमांच्या माणसांशी तुटक वागू नका. प्रेम प्रसंगामध्ये सावधगिरी बाळगा. जोडीदाराच्या इच्छापूर्ती साठी भेटवस्तूचा वापर करा. विरोधकांना संधी देऊ नका.
द्वितीयात नेपच्यून-केतू, पराक्रमात शुक्र, चतुर्थात बुध-शुक्र-हर्षल, पंचमात रवि, षष्ठात चंद्र-मंगळ, सप्तमात चंद्र, अष्टमात चंद्र-राहु, नवमात चंद्र-गुरु, व्ययस्थानात शनि-प्लुटो अशी ग्रहांची ठेवण आहे. प्रकृती बाबतीत हयगय करु नये. आपल्या आरोग्यावर ताण वाढेल असे काम टाळा. बाहेरील खाण्यापेक्षा घरगुती जेवण व फलाहारावर भर द्या. खर्चावर बुध्दीचातुर्याने नियंत्रण आणा. जमेल त्या पध्दतीने थोडया थोडया आर्थिक गुंतवणूक करणे भविष्यासाठी हितकराक आहे. आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा जवळ माणसे नसतील. संततीबाबत प्रश्न सुटतील. इतरांची अतिचिकित्सा करु नका. कोणावर अवलंबून राहणे टाळावे.
राशीस्थानी नेपच्यून-केतू, द्वितीयात शुक्र, पराक्रमात बुध-शुक्र-हर्षल, चतुर्थात रवि, पंचमात चंद्र-मंगळ, षष्ठात चंद्र, सप्तमात चंद्र-राहु, अष्टमात चंद्र-गुरु, लाभस्थानी शनि-प्लुटो असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. घरातील वातावरण समाधानकारक असल्याने कौटुंबिक स्वास्थ लाभेल. कुटुंबासाठी इच्छित खरेदी कराल. कुटुंबात शुभकार्य होईल. नातलग, पाहुणे यांची भेट होईल. अर्थप्राप्तीसाठी सुयोग्य नियोजन करा. कोणताही आर्थिक व्यवहार अनोळखी व्यक्तीशी करु नका. प्रेम संबंधात एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. संयमाने साथीदारांशी वागल्यास प्रेमात वृध्दी होईल. जोडीदाराशी कुठल्याही खाजगी गोष्टी लपवू नका. जोडिदाराची काळजी घ्या व त्यांच्या मर्जीप्रमाणे वागून मार्ग काढा.
आपल्या राशीत शुक्र, द्वितीयात बुध-शुक्र-हर्षल, पराक्रमात रवि, चतुर्थात चंद्र-मंगळ, पंचमात चंद्र, षष्ठात चंद्र-राहु, सप्तमात चंद्र-गुरु, दशमात शनि-प्लुटो, व्ययात नेपच्यून-केतू असे ग्रहमान प्राप्त होणार आहेत. घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ वाढेल. घरच्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत. घरात ज्येष्ठांना चार सबुरीच्या गोष्टी सांगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिविकास हे ध्येय बाळगावे. विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक अभ्यासात मन रमवण्याचा प्रयत्न करावा. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. प्रिय व्यक्तीच्या लहानसहान अपेक्षांचा अंदाज घ्या. यंदा कर्तव्यअसणाऱ्यांना विवाहकारक योग येतील. वैवाहिक जीवनसाथी उदार अंतःकरणाचा व मुक्त विचारांचा असेल.