Horoscope Marathi - Kalnirnay Horoscope - August 2019
Friday, 11 October 2024 11-Oct-2024

Horoscope (Marathi)- August 2019

राशीभविष्य - ऑगस्ट २०१९

मेष

आत्मविश्वासाने सद्य परिस्थितीला सामोरे जा.अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने कामे मार्गी लागतील.मैत्रीत पैशांचे व्यवहार टाळा.अथक प्रयत्नांच्या जोरावर अपेक्षित यश मिळवू शकाल.कुटुंबातील प्रश्न सामूहिक चर्चेनेच सुटू शकतील.


वृषभ

यश दृष्टिपथात आल्याचे जाणवेल.आर्थिक प्राप्तीत होणारी वाढ व कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे मिळणारे सहकार्य यामुळे आत्मविश्वास बळावेल.वैवाहिक जीवनात काही आनंदाचे प्रसंग येतील.उत्तरार्धात जमीन-जुमल्याबाबत प्रश्न उद्भवतील.


मिथुन

ज्येष्ठांच्या योग्य मार्गदर्शनाने कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करू शकाल.गुप्तशत्रूंचे मनसुबे उधळून लावाल.धनप्राप्ती संभवते.उत्तरार्धात अनुकूलता वाढल्याने नोकरी-व्यवसायात उत्तम गती प्राप्त होईल.


कर्क

उद्भवणाऱ्या अडचणींवर शांतपणे,विचारपूर्वक मार्ग काढावा लागेल.कार्यक्षेत्रात एखादी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल कुटुंबातील वादविवाद मनस्ताप वाढवतील.पोटाच्या तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.


सिंह

सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील असे नाही.मनाविरुद्धच्या घटनेचा रोजच्या व्यवहारावर परिणाम होऊ देऊ नका. प्रवासात अधिक सतर्क राहा. काहींना नेत्रविकारांपासून त्रास संभवतो. महिलांना तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागेल.


कन्या

उत्साह आणि आत्मविश्वास वाढविणारे सध्याचे ग्रहमान आहे.आपली ईप्सित कामे पार पाडण्यास उत्तम काळ.सरकारदरबारी पत वाढेल.नोकरदारांना बढती-बदलीचे योग आहेत.कामानिमित्त प्रवास संभवतो.


तूळ

अतिउत्साहात घेतलेला निर्णय नंतर महागात पडू शकतो,याचे भान ठेवा. प्रतिष्ठितांचा सहवास लाभेल.उद्योग-व्यवसाय विस्ताराच्या संधी अमलात आणू शकाल.आहारावर नियंत्रण ठेवा.आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याकडेही लक्ष द्या.


वृश्चिक

‘कोणाला जवळ करायचे व कोणाला लांब ठेवायचे’ हे ठरवून वागा.तुमच्या आततायीपणामुळे नुकसान संभवते.उत्तरार्ध थोडा अनुकूल आहे.इच्छापूर्ती होईल. गुंतवणुकीस योग्य वेळ कौटुंबिक जीवन समाधानी असेल.


धनु

आपले यश प्रयत्नसाध्य असेल.गुंतवणुकीच्या येणाऱ्या प्रस्तावावर विचारपूर्वक निर्णय घ्या.विरोधकांबरोबरच्या वादविवादाचा परिणाम आपल्या दैनंदिन व्यवहारावर होऊ देऊ नका.आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.


मकर

सध्याचे ग्रहमान आपली सत्त्वपरीक्षा पाहणारे आहे.स्वकर्तृत्वावर भर द्या.कुणाकडून मदतीची अपेक्षा करू नका.घरातील ज्येष्ठ व्यक्तीच्या तब्येतीची अधिक काळजी घ्यावी लागेल.सरकारी नियम, कायदे-कानून यांची चौकट मोडू नका.


कुंभ

या महिन्यात अपेक्षेनुसार यश पदरी पडेल.व्यावसायिक अंदाज अचूक ठरून नवे आर्थिक स्रोत हाती येतील.सामाजिक कार्यातील सहभागाने तुमचा नावलौकिक होईल. मानमरातब वाढेल.घरातील एखाद्या व्यक्तीच्या विक्षिप्त वागण्याने थोडा त्रास सहन करावा लागेल.


मीन

नोकरी-व्यवसायात तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होईल.अनेक प्रलंबित कामांना गती मिळेल.कौटुंबिक जीवनात आनंदाचे वारे वाहू लागतील. गुंतवणूक करा. विवाहेच्छुकांना योग्य स्थळे सांगून येतील.


Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.