Horoscope (Marathi)- February 2018 - Kalnirnay
Thursday, 10 October 2024 10-Oct-2024

Horoscope (Marathi)- February 2018

राशीभविष्य - फेब्रुवारी २०१८

मेष

ह्या महिन्यात ग्रहमानाची अनुकूलता असल्याने तुम्ही तुमचे विचार समोरच्या व्यक्तीला पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. कामानिमित्त प्रवास संभवतो. प्रकृती सांभाळा.


वृषभ

ग्रहमानाकडून फारशी साथ नाही.जसा वारा तसे शीडअशी भूमिका सध्या घ्यावी लागेल. काही प्रसंगी तुम्हाला खोटे पाडण्याचा प्रयत्न होईल, विचलित होऊ नका. शेवटी तुम्हीच यशस्वी व्हाल.


मिथुन

सध्या तुम्हाला थोडे अधिक सतर्क राहून विरोधकांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे मात्र कठीण जाईल. व्यावसायिक भागीदारांशी काहीसे मतभेद होण्याची शक्यता संभवते. त्यांचाही प्रस्ताव विचारात घ्या.


कर्क

या महिन्यात आप्तेष्टांबरोबर मतभेद, वादविवाद संभवतात. यात तुमचा वेळ आणि शक्ती नाहक खर्च होईल. उत्तरार्धात नोकरी-व्यवसाय क्षेत्रात अपेक्षित प्रगती साधता येईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.


सिंह

यशाची कमान उंचावणारा हा महिना आहे. मात्र मनावर संयम ठेवावा लागेल. नोकरी-व्यवसायातील आपल्या नव्या योजनांबाबत अधिक सतर्क राहा. विरोधकांना त्याचा सुगावा लागणार नाही याची दक्षता घ्या.


कन्या

नोकरदार व्यक्तींना आव्हानात्मक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. सचोटीने काम पार पाडलेत तर यश पदरी पडणारच. खोट्या प्रलोभनांना बळी पडू नका. उत्तरार्धात धनप्राप्ती चांगली होईल.


तूळ

छोट्या-छोट्या कामांत अधिक वेळ, शक्ती आणि पैसा खर्च होण्याची शक्यता ह्या महिन्यात संभवते. संयमाने व गोड बोलून कामे पूर्ण करून घ्या. मित्रपरिवारात सध्यातरी आर्थिक व्यवहार करू नका.


वृश्चिक

हाताखालच्या लोकांवर थोडे अधिक लक्ष द्याअसेच ह्या महिन्याचे तुम्हाला सांगणे आहे. पदप्रतिष्ठेचा अधिक बाऊ न करता, कर्तव्यदक्ष राहिलात तर ईप्सित साध्य करू शकाल. कामानिमित्त प्रवास संभवतो.


धनु

तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराकडून सहकार्याची अधिक अपेक्षा ठेवू नका. उत्तरार्ध उत्साहवर्धक राहील. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. धनप्राप्तीचे योग संभवतात. नेत्रविकारावर त्वरित इलाज योजा.


मकर

कार्यात एकाग्रता आणि जिद्द वाढवाअसे ग्रहमानाचे तुम्हाला सांगणे आहे. प्राकृतिक अस्वास्थ्याचा आपल्या कामकाजावर परिणाम होऊ देऊ नका. तुमच्या शब्दांचा गैरअर्थ निघणार नाही याची काळजी घ्या.


कुंभ

एखाद्या अनपेक्षित बाबीमुळे अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे. वाढती आवक तुमचा आत्मविश्वास वाढवेल. पित्ताच्या किंवा अपचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नको. कौटुंबिक वादविवाद वाढू देऊ नका.


मीन

व्यवसायात लाभ व नोकरीत पदोन्नती होण्याचा सध्याचा काळ आहे.शिर सलामत तो पगडी पचास’  या न्यायाने नवीन आव्हानांस सामोरे जाताना प्राकृतिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. खर्च आटोक्यात कसा राहील हे पाहा.


Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.