Horoscope Marathi - Kalnirnay Horoscope - March 2019
Sunday, 6 October 2024 6-Oct-2024

Horoscope (Marathi)- March 2019

राशीभविष्य - मार्च २०१९

मेष

‘पेरल्याशिवाय उगवत नाही’ हे लक्षात असू द्या. महिन्याचा पूर्वार्ध चांगला जाणार. नोकरदारांना नवीन पदलाभ संभवतो. व्यवसाय-उद्योगात थोरामोठ्यांची कृपादृष्टी राहील. उत्तरार्धात आर्थिक बाबींत थोडी सतर्कता बाळगावी लागेल.


वृषभ

अनुकूल ग्रहमान आणि उत्साही मन यांच्या संयोगाने प्रगतीचा वेग वाढणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. कौटुंबिक वाद वेळीच मिटवा. काहींना नेत्रविकारापासून थोडा त्रास संभवतो. वाहन खरेदी होईल.


मिथुन

 आपल्या चुका जाणून घेऊन वागलात तर मनस्ताप टाळू शकाल. आपले तेच खरे करण्याचा अट्टहास करू नका. सध्यातरी कार्यक्षेत्रात मोठे बदल नको. नवीन जबाबदारी स्वीकारताना विचारपूर्वक होकार द्या. कायदेभंग करू नका.


कर्क

सध्या परिस्थिती तेवढी अनुकूल नसली तरी तुम्ही जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमाच्या जोरावर यश खेचून आणू शकाल. गोडीगुलाबीने कार्यभाग साधून घ्या. बेरजेची गणिते आखा. विरोधकांच्या हालचालींवर अधिक लक्ष आवश्यक.


सिंह

चर्चेने समस्या सुटतात, वादविवादाने नाहीत. गोड बोलून विषय हातावेगळे करण्याचा प्रयत्न करा. मागील काही घटनाक्रमांचे पडसाद आता उमटल्याने मनःस्थितीवर थोडा परिणाम होईल. संयम बाळगा. कौटुंबिक गरजांना प्राधान्य द्यावे लागेल.


कन्या

एक डाव आपण जिंकला, याचा अर्थ प्रत्येक डाव आपण सहज जिंकू अशा समजुतीत राहू नका. जवळच्या एखाद्या व्यक्तीशी वैचारिक वाद होतील. झटपट लाभाच्या मागे लागू नका. ज्येष्ठांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष नको.


तूळ

पैसा म्हणजे सर्वस्व नसले तरी पैशाअभावी बऱ्याच गोष्टी अडतातही! हाती असलेल्या पैशाचे योग्य नियोजन करणे सध्या गरजेचे आहे. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.


वृश्चिक

जमीन-जुमला तसेच घरासंबंधीचे प्रश्न या महिन्यात थोडे त्रासदायक ठरतील असे दिसते. सामाजिक कार्यातील सहभागामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. सरकारी कायदे-कानून तोडू नका.


धनु

मित्रमंडळींचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे लाभेल.पूर्वी जपलेले संबंध योग्य वेळी उपयोगी पडणार आहेत.नव्या संकल्पना अमलात आणता येतील.खाण्यापिण्यावर काटेकोरपणे निर्बंध ठेवा.उत्तरार्धात लक्ष्मीप्राप्तीचे चांगले योग संभवतात.


मकर

असंगाशी संग नको.आपण आपल्या मित्रमंडळींवरून ओळखले जातो हे ध्यानात ठेवून वागण्याचा काळ आहे.महिन्याचा उत्तरार्ध अधिक यशदायी असून आपली कामे या काळात मार्गी लागतील.पोटाच्या विकारांकडे लक्ष द्या.


कुंभ

या महिन्यात तुम्हाला स्वतःच्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.कार्यक्षेत्रातील सद्य परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतील.आर्थिक प्राप्ती वाढणार असली तरी खर्चाचे प्रमाणही वाढणार आहे.कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळेल.


मीन

 लहानशा कामाला अधिक शक्ती खर्ची होण्याचा काळ आहे.आपली नाराजी इतरांकडे अजिबात व्यक्त करू नका.गोडी-गुलाबीने वागलात तर सरशी तुमचीच. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा.विवाहेच्छुकांना सुयोग्य जीवनसाथी मिळेल.


Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.
Note: You're Browsing the OLD Website
This is the OLD version of the Kalnirnay website that has been made available for reference only. By proceeding to browse further, you understand that any information submitted by you will not be processed in any way. Any orders submitted here will not be processed.