फक्त विचारच करत बसलात तर योग्य मार्ग सापडणार नाही, कृती करा. नोकरी-व्यवसाय क्षेत्रात प्रगती संथ गतीने होत असल्याचे जाणवेल. प्रयत्नांचा वेग वाढवा. उत्तरार्धात आलेल्या संधीचा फायदा उठवा.
प्रत्येक गोष्टीचे नियोजन तुम्ही योग्य रीतीने करता त्यामुळे कामात सहजता येते, हेच सूत्र नेहमी अवलंबा. आर्थिक व्यवहार करताना बोलणी सावधपणे करा. तडकाफडकी निर्णय नको. कामात एकाग्रता हवी.
आपला हेतू साध्य करायचा असेल तर आपले वागणे-बोलणेही त्याला अनुसरुनच हवे. कामातील अचूकतेवर भर द्या. अधिकाराच्या मर्यादा ओलांडू नका. चैनीच्या खर्चाला आळा घाला.
तुमच्या कष्टाचे चीज होण्याचा काळ आला आहे.योग्य पावले उचललीत तर तुमची सरशी नक्कीच होणार.विरोधकांच्या कारवायांना आळा बसेल.आर्थिक बाबींत कोणावरही अतिविश्वास ठेवू नका, फसगतीची शक्यता आहे.
‘जशी भरती येते तशी ओहोटीही होते,’ हे लक्षात असू द्या.कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्या.तुमच्या कार्याची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल.गुंतवणुकीचे प्रस्ताव थोडे पुढे ढकला.
सध्या असलेले गुरुचे पाठबळ ही जमेची बाजू होय.तुमच्या गोड, मुद्देसूद बोलण्यानेच समोरच्याला तुम्ही नमते घ्यायला लावणार आहात.मित्रपरिवारात आवाक्याबाहेरील आश्वासने देऊ नका.
‘विचार थोडा व कृती जास्त’ असे धोरण ठेवा.प्रत्यक्ष कृतीला प्राधान्य द्या.तज्ज्ञांचा घेतलेला सल्ला धनवृद्धीसाठी फायदेशीर ठरेल.उत्तरार्धात प्रासंगिक समस्यांना सामोरे जावे लागेल.जिभेवर ताबा ठेवा.
कार्यसिद्धीचा काळ आहे.कर्तृत्वास चालना मिळेल.जे काम कठीण वाटत होते त्यातून सहज मार्ग सापडेल.शब्दांच्या योग्य वापराने गैरसमज टाळू शकाल.मैत्रीमध्ये व्यवहार नको.प्रवासातून आनंद मिळेल.
‘मतभेद टाळलेत तर मनस्तापही टळेल’ हे सूत्र बाळगून वागलात तर मार्ग सुकर होईल. उत्तरार्धात रविची मिळणारी साथ प्रतिकूलतेवर मात करण्यास मदत करेल. रखडलेल्या कामांना गती प्राप्त होईल.
घरातील भांडणे घरातच ठेवा.आहारावर नियंत्रण ठेवणे सध्या फार महत्त्वाचे आहे.प्रवासात काही अनपेक्षित गोष्टींमुळे त्रास संभवतो.जमीन-जुमल्याची कामेपुढे ढकला. कर्ज काढू नका तसेच कुणाला जामीनही राहू नका.
ग्रहमान पूर्णपणे साथ देणारे, अनुकूल असे आहे.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.तुमच्या शब्दाला महत्त्व प्राप्त होईल.सरकार दरबारी प्रतिष्ठा वाढेल.मित्रमंडळींच्या सहवासात आनंदून जाल.
कोणाला किती जवळ करायचे हे ठरवून वागा. चहाडखोर व्यक्तीमुळे थोडा त्रास संभवतो. सामंजस्याने प्रश्न सोडविणे हिताचे ठरेल.प्राकृतिक स्वास्थ्यासाठी आहाराविहारावर नियंत्रण आवश्यक आहे.प्रवास कार्यसफल होईल.
Version 2.5.1
[contact-form to=”kalnirnay@kalnirnay.com” subject=”Ask Kalnirnay Expert”][contact-field label=”Name” type=”name” required=”1″][contact-field label=”Email” type=”email” required=”1″][contact-field label=”Mobile” type=”text” required=”1″][contact-field label=”Your Query” type=”textarea” required=”1″][/contact-form]