ह्या महिन्यात मित्रपरिवारात आपले वागणे-बोलणे सावध असले पाहिजे. छोट्याशा गोष्टीने गैरसमज होण्याची शक्यता जाणवते. गुरुच्या पाठबळामुळे मात करणे कठीण जाणार नाही. महिलांनी आपल्या निर्णयाशी ठाम राहावे.
दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्ही वाटचाल करणार असाल तर सतर्क राहा. थोरामोठ्यांचा सल्ला घेणे उचित ठरेल. गृहकर्तव्याला प्रथम प्राधान्य द्या. प्रवासात काळजी घ्या व खर्चावर नियंत्रण ठेवा.
नोकरी-व्यवसाय क्षेत्रात मनाजोगत्या घटना घडतील. वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. मित्रपरिवाराकडन अपेक्षित सहकार्य लाभेल. अनपेक्षित प्रवासामुळे थोडा त्रास सहन करावा लागेल. खाण्यापिण्यावर संयम असू द्या.
नुकत्याच सहवासात आलेल्या व्यक्तींवर अतिविश्वास नको. चहाडखोरांपासून नाहक मनस्ताप होईल. कौटुंबिक पातळीवर आनंददायी वातावरण असेल. कायदा हातात घेऊ नका.
‘ नवी विटी नवा डाव ‘ अशा स्वरूपाचा काहीसा हा महिना असणार आहे. विरोधक नमतील. परिस्थितीचा अचूक फायदा उठवा. जुजबी ओळखीत आर्थिक गुंतवणूक करू नका. बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.
आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घेण्याचा काळ आहे. नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. कोणताही प्रश्न प्रतिष्ठेचा न करता आपले काम करणे हितावह ठरेल. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
‘ भित्यापाठी ब्रह्मराक्षस ‘ म्हण तुम्ही जाणताच. आलेल्या समस्यांना धैर्याने सामोरे जा. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होणार नाही हे पाहा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. हातून एखादे शुभकार्य घडेल.
कामकाजातील गतीचा वेग वाढविण्यासाठी युक्तीचा कल्पकतेने केलेला वापर यशस्वी होईल. आर्थिक पातळी उंचावेल. जवळच्या माणसांकडून अति अपेक्षा नको. प्रवासात चोरांपासून सावध राहा.
कार्यक्षेत्रातील स्पर्धेचा-सामना करण्यासाठी तुम्हाला एखादे नवे तंत्र अमलात आणावे लागेल, असे दिसते. ग्रहांची प्रतिकूलता नसली तरी एखाद्या छोट्याशा गोष्टीनेही तुम्ही विचलित व्हाल. महिलांनी अनावश्यक खरेदी टाळावी.
तुमच्यात माणसे हाताळण्याचे आणि राखण्याचे, अतिशय उत्तम कौशल्य आहे. आपले उद्दिष्ट साध्य करण्याकरिता थोडी पडती बाजू घेतलीत तर बिघडले कुठे ? मतभेद शक्यतो टाळाच. कलावंतांना प्रसिद्धीचे योग आहेत.
सध्या तुम्ही तुमच्या भावनांवर थोडे नियंत्रण ठेवलेत तर परिस्थिती तुमच्या बाजूने होईल. जे तुम्हाला पटत नाही ते कुणाच्यातरी आग्रहाखातर अजिबात करु नका. विरोधकांचे मनसुबे उधळून लावाल.
जर घाईगडबडीने निर्णय घेणे टाळलेत तर सरशी तुमचीच होणार. मित्रपरिवारात आणि कौटुंबिक पातळीवर आपलेच म्हणणे खरे करण्याच्या फंदात पडू नका. हवामानातील बदलाचा शरीरिक त्रास सहन करावा लागेल.
Version 2.5.1
[contact-form to=”kalnirnay@kalnirnay.com” subject=”Ask Kalnirnay Expert”][contact-field label=”Name” type=”name” required=”1″][contact-field label=”Email” type=”email” required=”1″][contact-field label=”Mobile” type=”text” required=”1″][contact-field label=”Your Query” type=”textarea” required=”1″][/contact-form]