Description
मानसोपचार तज्ञ नसेल तिथे
डेव्हिड वेर्नर. पेशाने शिक्षक. ते एकदा मेक्सिकोच्या डोंगराळ प्रदेशात तिथल्या प्राण्यांची आणि वनस्पतींची चित्रे काढण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना असं आढळलं की विज्ञानाचा पाया असलेली कुठल्याच प्रकारची आरोग्यसेवा तिथल्या लोकांना मिळत नाही. उलट आरोग्यसेवकांकडे गेलं तर लोकांच शोषणच होतं. आरोग्यक्षेत्रातील काही सहका-यांच्या मदतीने १९७७ साली डेव्हिड वेर्नर यांच्या ‘व्हेयर देयर इज नो डॉक्टर’ (Where There is No Doctor—WTIND) या पुस्तकाच्या पहिल्या काही प्रती स्पॅनिश भाषेत प्रसिध्द झाल्या. लवकरच या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती प्रसिध्द झाली. आरोग्यक्षेत्रातील अनेक वर्षे जाणवत असणारी मोठी गरज या पुस्तकाने पूर्ण केली असंच म्हणायला हवं.
मानसोपचार तज्ञ नसेल तिथे–विक्रम पटेल– सुमंगलप्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.