Description
कालनिर्णय दिवाळी अंक २०२१
हिंदी चित्रपटसृष्टीला जॅझच्या तालावर नाचवणारा संगीतकार चिक चॉकलेटचा संगीतप्रवास, बॉक्सऑफिसवर राज्य करणारे दिग्दर्शक राज खोसला यांची कारकीर्द, प्रेक्षकांना जाहिराती बघायला लावणारे सर्जनशील कलाकार पियुष पांडे यांचा जाहिरात क्षेत्रातील प्रवास, शांता शेळके यांच्याबद्दलच्या काही वैयक्तिक आठवणी, राजस्थानमधील लोककला ‘लिजेंड’ सर्पकन्या गुलाबो सपेरा यांची कलासाधना, लेखनाद्वारे प्रचंड पैसा कमावता येतो हे दाखवून देणारे व रहस्यकथांना शृंगाराचा मुलामा देणारे लेखक सुभाष शहा यांचे साहित्य, दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझींच्या विरोधात हेरगिरी करणारी नूर इनायत खान या ब्रिटिश महिला गुप्तहेराची कामगिरी, कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचा पाया घालणाऱ्या नेत्यांपैकी एक अग्रणी नेते गोपाळ कृष्ण गोखले यांची ऐतिहासिक ओळख, सुलतान सलाद्दिन या मुस्लिम योद्ध्याची कामगिरी, गिर्यारोहणातून व्यावसायिक यश मिळवण्याचा मंत्र, लोकशाही राबवणाऱ्या भारताची सामाजिक प्रगल्भता, गाजलेल्या रोड मूव्हीजचा घेण्यात आलेला आढावा आणि चिनी-सिंगापूरी कुटुंबव्यवस्थेचे चित्रण तसेच पाकनिर्णय स्पर्धेतील १८ उत्तेजनार्थ पाककृती, कथा, कविता, व्यंगचित्रे, राशिभविष्य, मामंजी यांचे विनोदी किस्से असा भरगच्च मजकूर वाचकांना यंदाच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक २०२१ या अंकात वाचता येईल.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
Reviews
There are no reviews yet.