Description
लेखक – जयराज साळगावकर
परम मित्र पब्लिकेशन्स
निओ गुटेनबर्ग ही महान गुटेनबर्गला समकालीन नजरेतून वाहिलेली आदरांजली आहे.
ही प्रत्यक्षात मानवजातीची गोष्ट आहे. माणसाची त्याच्या ज्ञानाची भूक वाढण्यासाठी, उत्क्रांत होण्यासाठी त्याने माहिती जमवली कशी, तिचे सुसूत्रीकरण कसे केले याची हकीगत आहे. दगडाच्या शीळेपासून फोन टॅब्लेट पर्यंतचा प्रवास, त्याची वळणे, स्वरुप यांसह चित्ताकर्षक आहे. आपण जनावरांसारखे ओरडत होतो. स्वत:ला व्यक्त करण्यासाठी गुहांमधल्या भिंतीवर रेघ ओढत होतो. तेव्हापासून किमान तीन हजार वर्षे झगडत आलेला माणूस आपल्याला आक्रमक प्राणी वाटतो. तेव्हापासून कम्युनिकेशन (दळणवळण) खूप पुढे आले आहे. मातीच्या विटांपासून आधुनिक फोनेटिक्सपर्यंतचा प्रवास हजारो वर्षांचाआहे. फोनेटिक्सचा विकास झाल्यानंतरच आपला बौध्दिक विकास वेगाने झाला. परंतु हाताने लिहिणे आणि त्याच्या आकृत्या काढणे यांच्य माहितीची वृध्दी आणि वितरण यांमध्ये मोठा फरक होतो. यात लाकडाचे चिनीब्लॉक्स आणि नंतर मूव्हेबल टाइप छपाई यांनी बदल झाला आणि साहित्याच्या प्रसाराला वेग आला.
Reviews
There are no reviews yet.