Description
जगाच्या ज्ञात इतिहासात काही सेनानी अजरामर होऊन गेले आहेत. आजही युध्दनीतीचा विचार करताना नेपोलियनच्या रणनीतीचा उल्लेख आवर्जून केला जातो. नेपोलियनच्या युध्दनीतीवर आजही दरवर्षी शेकडो पुस्तके प्रसिध्द होत असतात. आपल्या सैनिकी कारकिर्दीत शेवटी जरी नेपोलियनला पराभव पत्करावा लागला असला तरीही त्याची युध्दनीती मात्र आजही सर्वश्रेष्ठ समजली जाते. त्याचा वॉटर्लूच्या लढाईत पराभव करणारा सेनानीसुध्दा कोणी ऐरागेरा नव्हता तर ड्यूक ऑफ वेलिंग्टन ऊर्फ आर्थर वेल्स्ली होता.याने भारतात बलशाली टिपूचा (1811) तर मराठयांचा असई (1812) येथे पराभव केला. यानंतर तो नेपोलियनवर चाल करुन गेला. ड्यूक ऑफ वेलिंग्टन हा इंग्रज सेनानीसुध्दा बाजीरावाप्रमाणेच आयुष्यात कधीही पराभूत झाला नाही. नंतर तो इंग्लंडचा पंतप्रधान झाला.
लेखक- जयराज साळगावकर प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन्स
Reviews
There are no reviews yet.