Description
ज्योतिष, धर्मशास्त्र, संतसाहित्य अशा विविध विषयांचा प्रदीर्घ व्यासंग असलेले ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर ह्यांनी आयुष्याच्या वाटचालीत अनेक चढउतार पाहिले, बहुधा त्यामुळेंच त्यांना परमेश्वर, धर्म आणि इहलोकीचा व्यावहारिक प्रपंच याबाबतीत एक वेगळी वैचारिक बैठक लाभली. हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मांचाही सखोल अभ्यास केला असल्याने तौलनिक दृष्टीने विचार करण्याची सवय लागली. ‘‘देवाचिये व्दारी’’ मध्ये पानापानावर त्यांच्या व्यासंगाचा वाचकांना प्रत्यय येईल.
‘देवाचिये व्दारी’ हे सदर दैनिक ‘लोकसत्ता’ मध्ये १९९५ ते १९९९ अशी सलग पाच वर्षे अखंड चालले. ह्या सदरात पाच वर्षांच्या काळात जे लेख प्रसिध्द झाले. त्याचा पहिला व दुसरा खंड अनुक्रमे ‘देवाचिये व्दारी’ आणि ‘सुंदर ते ध्यान’ हे या आधीच मे. केशव भिकाजी ढवळे या संस्थेने प्रकाशित केले आहेत. पुढील तिसरा खंड ‘अमृताची खाणी’ , चौथा खंड ‘आनंदाचा कंद’, आणि पाचवा खंड ‘ज्ञानाचा उद्गार’ असे एकाच वेळी प्रकाशित झाले.
देवाचिये व्दारी– ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर –सुमंगल प्रेस प्रा.लि., दादर, मुंबई
Reviews
There are no reviews yet.