Description
कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१६’ च्या अंकात नेहमीप्रमाणे विविध विषयांचा समावेश आहे. नरेंद्र चपळगावकर यांनी वल्लभभाई पटेल यांची धर्मनिरपेक्षता आणि दूरदृष्टी या विषयी लिहिले आहे. डॉ. अरविंद गणाचारी यांनी पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी बजावलेले शौर्य,त्यांचे बलिदान आणि इंग्रजांनी नजरेआड केलेले त्यांचे योगदान याविषयी सविस्तर लिहिले आहे.
‘कट्टयाचे गेलेले दिवस’ या लेखातून श्रीरंग गोडबोले यांनी आपल्या गतस्मृतींना अतिशय मार्मिक आणि विनोदी भाषेत उजाळा दिला आहे. मनोरंजन विभागात वाचकांना विविध लेखांची मेजवानी मिळणार असून कविता,हायकू,विनोदी चुटके आणि विक्रमादित्य पणशीकर यांचे राशिभविष्य असा भरघोस मजकूर वाचायला मिळणार आहे.
Publisher : Kalnirnay
Reviews
There are no reviews yet.