Description
लेखक – जयराज साळगावकर
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
‘सारस्वतांचा संक्षिप्त इतिहास’ लिहिण्याचा विचार गेली १० वर्षे मनात होता. त्यानुसार संदर्भ ग्रंथांची जुळवाजुळव करीत गेलो आणि आश्चर्य म्हणजे जे हवे ते संदर्भ ग्रंथ आपसूक मिळत गेले. ह्या सर्व पुस्तकांत एक महत्वाचे पुस्तक म्हणजे‘कोंकणाख्यान’, हे महाकाव्य होय! गो.मं. लाड ह्यांच्या ‘सारस्वत भारतीय संस्कृतीचे उपासक’ तसेच डॉ.पांडुरंग सदाशिव पिसुर्लेकर ह्यांच्या ‘श्री शांतादुर्गा चतुःशताब्दी महोत्सव ग्रंथ’,व्ही.एन.कुडवा ‘हिस्ट्री ऑफ द दाक्षिणात्य सारस्वतस्’ यांच्या ‘सरस्वतीमंडल’ ह्या ग्रंथांत कोंकणाख्यान चा उल्लेख प्रकर्षाने जाणवतो. हे पुस्तक कितीही शोध घेतला तरी काही मिळेना. परंतु पंडित दाजी पणशीकर यांचे सुपुत्र विक्रमादित्य पणशीकर (पेडणे, गोवा) ह्यांनी ह्या पुस्तकाची एक दुर्मिळ प्रत मिळवून दिली.
Publisher : Kalnirnay
Reviews
There are no reviews yet.